शाळेत बेंचवर बसण्याच्या वादातून विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; एकाचा मृत्यू

चंदीगढ (हरियाणा) : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बाकावर बसण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून झालेल्या वादाचं पर्यावसान थेट खुनात झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. बेंचवर बसण्यावरून हाणामारी हरियाणातील सोनिपत जिल्ह्यात बेंचवर बसण्याच्या मुद्द्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झालं होती. सरकारी माध्यमिक शाळेतील दोघांमध्ये झालेल्या या भांडणानंतर एकाने दुसऱ्याचा बदला घेण्याचं ठरवलं.

घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा हा विद्यार्थी त्याच्या भावासोबत शाळेतून बाहेर पडत होता, तेव्हा पहिल्या विद्यार्थ्यासोबत आलेल्या काहीजणांनी त्याच्यावर चाकूचा हल्ला केला. सोबत असणाऱ्या भावाने या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही या मुलांनी चाकूने भोसकले. हल्ल्यात एकाचा मृत्यू इमरान आणि समीर या भावांपैकी इमरानचं त्याच्या वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यांशी भांडण झालं होतं.

त्याचा राग मनात धरून ११ वीत शिकणाऱ्या इमरानवर हल्ला करण्यात आला. त्याचा बारावीत शिकणारा भाऊ समीरदेखील या घटनेत गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेतील दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यातील इमरानला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर जखमी समीरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here