कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यक सेलची तालुकानिहाय आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : रविवार (दि.२६) रोजी कोल्हापुर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (ग्रामीण) कोल्हापुर अल्पसंख्यक सेलची तालुका निहाय आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या सुचनेसअनुसरून ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि अल्पसंख्यक सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा निरिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आणि अल्पसंख्यक सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा निरिक्षक हुजुर इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हाध्यक्ष मायासिन मुजावर, बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित दुपारी ठीक 1.00 वा राष्ट्रवादी भवन, कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर, श्री शाहु मार्केटयार्ड, कोल्हापुर येथील जिल्हा कार्यालयात पार पडली

अरिफ तांबोळी यांनी स्वागत केले प्रास्तविक यासिन मुजावर यांनी केले. ए.वाय.पाटील, अनिल साळोखे, हुजुर इनामदार, बाळासाहेब देशमुख , इम्तियाज होलमणी, मेहबूबर सुलमुजावर, हरूण पटवेगार, महमंद महात यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

आभार मुनीर मुल्ला यांनी मानले. यावेळी मान्यवर नेतेगण व पदाधिकारी यांच्यासह विधानसभाध्यक्ष व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here