महावितरण वीज बिल सक्तीने वसुली करु नये; कबनूर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

कबनूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : बुधवारी कबनूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत शाखा कबनूर यांना विज बील सक्तीने वसुली करू नये व विज कनेक्शन कट करू नये तसेच विज बील भरण्यास सवलत मिळावी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.

या मागण्या मान्य न झाल्यास कबनूर महावितरण कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना कबनूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर, उपाध्यक्ष राहुल कांबळे, सुनील इंगवले सरकार, सतीश चव्हाण, बबनराव इंगळे, दिलावर पटेल, जावेद मुजावर, राम कांबळे लखन कांबळे तसेच कबनूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

kabnoor-ncp-nivedan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here