कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : राज्यातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा रेखाताई ठाकूर यांनी आज येथे केली. त्या पक्षाच्या ” पक्ष संघटन समीक्षा समन्वय व संवाद दौरा ” या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष गोविंदभाऊ दळवी हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ क्रांतीताई सावंत या ही उपस्थित होत्या.
त्या बोलतांना पुढे म्हणाल्या या ” संवाद ” दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. या मध्ये राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असून, आता पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी कडे पाहत आहेत,या सरकार बाबत पूर्ण भ्रम निरस झालेला असून,हे सरकार केंद्र सरकार प्रमाणे जुमले बाज सरकार असल्याचा ही त्यानी आरोप केला.
केंद्रातील मोदी सरकार बाबत बोलतांना त्या म्हणाल्या, 52 % असलेल्या राज्यातील ओबीसी समाजाला या सरकारने पूर्ण उद्ध्वस्त केलेले असून 2021 च्या जनगणनेत OBC समाजाची जनगणना करणार नसल्याचे शपथपत्र सुप्रीम कोर्टात सादर केलेले आहे.असे सांगून या सरकार कडे OBC समाजाचा जात गणणनेचा इम्पीरीकल डाटा उपलब्द असताना ही कोर्टास देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे OBC समाज्याचे राजकीय आरक्षण पूर्ण धोक्यात आलेले आहे. असे सांगून या OBC समाजाच्या विरोधातील या सरकारचा त्यांनी जाहीर निषेध केला.
कार्यक्रमाची सुरुवात पक्षाच्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यानी टू व्हीलरच्या रॅलीने शहराच्या मुख्य मार्गावरून प्रचंड मोठया शक्ती प्रदर्शनाने केली. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळला व ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, स्वागत व प्रास्तविक जिल्हा अध्यक्ष मा.विलास कांबळे यांनी केले. तर पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष मा.गोविंद दळवी यांनी संघटनात्मक ध्येयधोरण, पक्षशिस्त, कामकाजावर आपल्या ओघवत्या शैलीत चौफेर हल्ले चढवीत पक्षांतर्गत शिस्त व कामकाजा विषयी मांडणी केली. पक्षनिरीक्षक मा. क्रांतीताई सावंत यांनी पक्षवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पैलूंचा ऊहापोह केला. राज्यात पक्ष ताकतीने उभा राहत असून” सवांद ” दौऱ्याच्या निमित्ताने तो ढवळून निघालेला आहे.
या मेळाव्यास राज्यकमिटीचे पदाधिकारी बाबासाहेब कांबळे ( पुणे ), शाकिर तांबोळी ( इस्लामपूर ), चंद्रकांत खंडाईत (बापू) ( सातारा ), चंद्रकांत फडतारे ( सोलापूर ), आदी उपस्थित होते.
मेळावा यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष पुंडलिकभाऊ कांबळे, महासचिव प्रा.आदिनाथ कांबळे,( हातकणंगले ) महासचिव महादेव कुंभार (शिरोळ ), सचिव महेश महाडिक ( जयसिंगपूर ) आयटी प्रमुख जुबेर मोमीन ( कुरुंदवाड ) सह सचिव शमशुद्दीन मोमीन (वडगांव ) सम्यक विध्यर्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भारतीय, जिल्हा कोषाध्यक्ष संजय कांबळे ( शिरढोण ) अविनाश बनगे ‘ राजू बनगे ( सिद्धार्थ नगर ) कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यास जिल्ह्याच्या विविध भागांतील असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शीविली होती, कागल, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, शिरोळ, हातकंगले, शाहूवाडी, गगनबावडा, करवीरसह कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांचा ही समावेश होता.
जिल्हा सचिव सुरेश थरकार, जिल्हा प्रवक्ते प्रा.ज्ञानराज चिघलीकर , जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव फुले, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कांबळे ( रुकडी ) जिल्हा उपाध्यक्ष डॉ मारुती कांबळे, जिल्हा संघटक संजय प्रधान ( कागल ) सह सचिव सचिन कांबळे ( शाहूवाडी ) अरुण जमणे, महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्ष निलम प्रधान, कोषाध्यक्ष योगिता बोकने, उपाध्यक्ष करुणा कांबळे, मालन शिंदे, सलमा मेमन (शिरोली ) विमल पोखर्णिकर तर तालुका अध्यक्ष विशाल कांबळे ( शिरदवाड ), आनंदराव कांबळे (कागल ), कासम शेख (भुदरगड ),अर्जुन दुन्डगेकर,( गडहिंग्लज ), अशापाक देसाई ( हातकणंगले ),संदीप कांबळे (शाहूवाडी) संजय कांबळे ( राधानगरी ) या शिवाय जिल्यातील आजी – माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा महासचिव प्रा.आदिनाथ कांबळे, यांनी केले तर आभार माहिलाध्यक्षा अस्मिताताई दिघे यांनी मानले.






