स्व.शरदकुमार बन्सी यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम धरणगावी साजरा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव तालुका शिक्षक संघटनेचे मा.तालुकाप्रमुख स्व.शरद कुमार बन्‍सी लोकमत तालुका प्रतिनिधी यांचा प्रथम स्मृति दिवस कार्यक्रम मित्र परिवारातर्फे धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाच्या उहापोह व पत्रकारिता करीत असताना त्यांच्या मनमिळावू स्वभाव यासंदर्भात सर्व मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

ना.पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,संजय निराधार समिती अध्यक्ष गुलाबराव वाघ,मा.नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,विद्यापीठ चे सदस्य प्रा डी आर पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय महाजन,मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,चर्मकार समाजाचे महाराष्ट्राचे नेते भानुदास आप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी, प.रा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा संजीवकुमार सोनवणे,आदर्श शिक्षक प्रा बी एन चौधरी,आर डी महाजन सर,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे,चंदन पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,युवाधिकारी शिवराज पाटील,प.स.सभापती प्रेमराज पाटील,ता.काँग्रेस अध्यक्ष रतिलाल नाना चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी महाजन,संपादक भरतकुमार चौधरी,प्रभुदास जाधव,बी आर माळी सर,योगेश वाघ,नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन,भागवत चौधरी,विलास महाजन,कमलाकर पाटील,राजेंद्र महाजन,लक्ष्मण पाटील,रवी जाधव,राहुल रोकडे,विनोद रोकडे आदी मान्यवर पत्रकार सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here