शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील धुरखेडा रस्त्याची पावसामुळे दुरवस्था

शहादा (प्रतिनिधी रामेश्र्वर गिरासे) : तालुक्यातील काथर्दे दिगर येथील धुरखेडा रस्त्याची मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून वाहने जाऊ शकत नाही त्यामुळे लोकांना त्रासदायक ठरत आहे तसेच याचा त्रास शेतकऱ्यांनाही होत आहे जर शेतात जायचे असेल तर दोन किलोमीटर मोटरसायकल उभी करून शेतात जावे लागत आहे.

काथर्दे दिगर ते धुरखेडा पर्यंत ९० टक्के रस्ता खराब झालेला आहे यासाठी अनेकदा बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती तरी अद्याप कुठल्याही प्रकारचे लक्ष बांधकाम विभागाने दिलेले नाही. जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्याची अशी परिस्थिती झाली आहे. रस्ता दुरुस्ती करण्यात आणि अपूर्ण रस्ता पुर्ण करण्यात बांधकाम विभागाला अडचण काय? असा प्रश्न उभा राहात आहे

आतापर्यंत बांधकाम विभागाकडून काथर्दे दिगर येथील एकही रस्ता व्यवस्थित पणे पूर्ण केलेला नाही म्हणून यासाठी जिल्हाधिकारी तथा स्थानिक अधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून त्वरित काथर्दे दिगर ते धुरखेडा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा आणि अपूर्ण रस्ता पुर्ण करण्यात यावा असे काथर्दे दिगर येथील नागरिकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here