जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णकृती पुतळा उभारण्याची तालुकावासीयांची बऱ्याच वर्षापासुनची मागणी आहे . तसेच भुसावळ रोड चौफलीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची देखील मागणी बऱ्याच वर्षापासुन प्रलंबित आहे .

या दोन्ही महापुरुषांचे पुतळे शहरात बसविण्यासाठी संघटनेच्या वतीने मागील १० वर्षांपासुन पाठपुरावा करण्यात येत आहे मात्र प्रशासनाकडून आम्हाला नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळत आलेली आहे . तरी आपणास विनंती की येत्या आठ दिवसात आपण पुतळे बसविण्यासंदर्भात ठोस कार्यवाही करावी अन्यथा संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देत निवेदन नगराअध्यक्ष साधणाताई महाजन यांना दिले.शिवरायांच्या पुर्णाकृती अश्वरुढ भव्य दिव्य पुतळा नगरपालीका चौकात बांधला जाईल अशीयाच आश्वासन दिले.

sambhaji-bigrad-nivedan

निवेदन कर्ते संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ते गोपाल पाटिल ,नितिन मराठे,संजय भोयाटे,समाज घटक दशरत पाटिल,मयुर पाटिल,अशोक पाटिल,युवराज बिजागरे,प्रशांत गोसावी,गोपाळ वाजुळ,सिद्देश शिंदे, दिला आहे. तालुक्यात लवकरच शिव पुतळा संदर्भात येत्या दोन दिवसात सर्व सामावेशक घटकांना सोबत घेऊन मिटींग घेण्यात येणार आहे, अशी माहीती गोपाल पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here