महिला हवाई दल अधिकाऱ्यावर बलात्कार; अधिकारी अटकेत

कोईमतूर : येथील एअर फोर्स ट्रेनिग कॉलेजमधील महिला हवाई दल अधिकाऱ्यावर तिच्याच सहकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच तेथील मेडिकल सेंटरमध्ये तिची कौमार्य चाचणी केल्याची घटनाही घडली आहे.

बलात्कारानंतर संबधित महिला अधिकाऱ्याला तिच्या वरिष्ठांनी धमकावले तसेच तिला ब्लॅकमेलही केल्याचे संबधित अधिकाऱ्याने ऑनलाईन एफआरआयमध्ये नोंदवले आहे.

२६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणासाठी रेडफील्डमधील एअर फोर्स कॉलेजमधील महिला आयएएफ अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुख यांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here