लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसेन) : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर गावातील युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणीने येथील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोप करणाऱ्या तरुणीचं नाव प्रांशु शुक्ला असं आहे.
प्रांशु शुक्ला हिनं दिलेल्या माहितीनुसार तिचा मोठा भाऊ कल्लनचे एका तरुणासोबत भांडण झालं होतं. यावरुन पोलीस रात्री 8 वाजता प्रांशु यांच्या घरी चौकशीसाठी गेले. चौकशी करुन गेल्यानंतर पोलीस पुन्हा त्यांच्या घरी आले. यावेळी कोतवाली परिसरातील नाकाहा चौकीचे प्रभारी नरेंद्र प्रताप सिंह यांच्यासह ३ काॅन्स्टेबल पुन्हा प्रांशुच्या घरी गेले. २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ९ वाजता घरी येऊन पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप प्रांशुने केला. तसेच त्यांनी पुस्तके देखील फाडली असून प्रांशुच्या कानशिलात लगावली. यामुळे तिचं डोकं भिंतीवर आदळले आणि ती गंभीर जखमी झाली असल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मारहाण करताना त्यांच्यासोबत कोणी महिला कॉन्स्टेबल नसल्याचं प्रांशुने सांगितलं आहे. तसेच या घटनेवेळी प्रांशुची आई आणि वहिणी देखील घटनास्थळी उपस्थित होत्या.






