नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : अनेक व्यापारी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही अनोख्या कल्पना वापरत असतात. त्यामुळे सध्या व्यावसायिक स्पर्धेत नवनवीन पदार्थ पहायला मिळातात. असच काहीसं कर्नाटकातील बंगळुरु येथे झालं आहे. येथील एका हाॅटेलचालकाने लढवलेल्या यु्क्तीने त्याला चर्चेत आणलं आहे. या बाबत स्वतः काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी ट्विट केली आहे.
बंगळुरु म्हणजेच कर्नाटक म्हणलं की विशेष इडली, डोसा, मेदू वडांचा नाष्टा आलाच. अशातच तेथील एका हाॅटेल चालकाने आईस्क्रीमच्या कांडीवर इडलीची सजावत केली. त्यातली एक इडली सांबरमध्ये देखील बुडवून दिली जाती. त्यामुळे या प्लेटला आणखीन शोभा येते. या प्लेटचा फोटो शशी थरुर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना हास्यास्पद मात्र व्यावहारिक असं लिहलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
absurd but practical! https://t.co/R3yCCMwKVt
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 1, 2021
दरम्यान, शशी थरूर अनेक मजेशिर ट्विट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी त्यांच्या केलेल्या काही मिम्स देखील शेअर केल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या ट्विट रिट्विट करत हाॅटेल चालकाची तसेच कूकची देखील स्तुती केली आहे.






