दुचाकीच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या मित्रावर ब्लेडने वार; एकाला अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दुचाकी वापरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या एका मित्रावरच तरूणाने ब्लेडने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोपोडीत घडली.

याप्रकरणी आरोपी अजय शिवकुमार पिल्ले (वय २५, रा. नाईकचाळ, बोपोडी) याला खडकी पोलिसांनी अटक केली. ऋतिक गायकवाड (वय २२, रा. बोपोडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. अजय आणि आरोपी ऋतिक मित्र असून आठवड्यापूर्वी ऋतिकने अजयची दुचाकी नेली होती. त्यानंतर ऋतिकने अजयच्या दुचाकीचे नुकसान केले. त्यामुळे अजयने त्याला भरपाई मागितली असता ऋतिकने त्याला नकार दिला. काय करायचे ते कर, मी तुला बघतो, अशी धमकी देत शिवीगाळ केली. आता तुझा गेमच करतो, तुला खलास करून टाकतो, असे धमकावत ऋतिकने अजयवर ब्लेडने वार करत त्याला गंभीर जखमी केले.

या प्रकरणी खडकी पोलिसांनी कारवाई केली असून, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेजा शिंदे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here