चंद्रपूरातून बेपत्ता झालेल्या मुलींची पुण्यातून सुटका

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या दोन तर यवतमाळच्या एका अपहृत मुलीची सुटका करण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. २७ सप्टेंबर रोजी या अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. मैत्रिणीच्या घरी वाढदिवस असल्याचे सांगून मुली घरून पसार झाल्या होत्या.

कुटुंबीय व नातेवाईकांनी शोधाशोध केल्यावर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. तपासात या मुली यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील चार तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव गाठले. तिथे बाबुळगाव येथील एक मुलगीही त्याच दिवशी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. मोबाईल ट्रॅकिंगनंतर मुली व आरोपी पुण्यात असल्याचे उघड झाले होते.

पुणे पोलिसांच्या मदतीने तीन अल्पवयीन मुली व चार आरोपींना चंद्रपुरात आणण्यात आले आहे. रोहित संगीले (२०), शुभम मानेकर (२२), प्रमोद सोनावणे (२२), प्रशिक भोयर (२३) अशी राळेगावच्या ४ आरोपींची नावे आहेत. राळेगाव परिसरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.





LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here