लोणंद येथे गुटख्याच्या अवैध साठ्यावर कारवाई; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणंद (प्रतिनिधी) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गुटख्याचा साठा केल्याबाबत लोणंद ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना शुक्रवारी माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडेसो यांना याबाबत माहिती कळवून तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग सातारचे अधिकारी यांच्याशी संपर्क करून, त्यांना बोलावून घेतले.

या माहितीबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अजित बोऱ्हाडेसो, तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभाग सातारचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोणंद पोलीस स्टेशनची टीम व दोन पंच असे पोलीस ठाण्यातून सदरची ठिकाणी रवाना होवून संयुक्तपणे धाड टाकून कारवाई करून बंदी असलेले विमल, आर.एम.डी. व हिरा कंपनीचे एक लाख ८६ हजार किंमतीचा गुटखा जप्त करून कारवाई केली.

आरोपी सागर नाथाजी शिंदे (रा. लोणंद) यास ताब्यात घेतले. ही कारवाईत विशाल वायकर, एस. एन . पवार. महिला पोलिस उपनिरीक्षक , पोलीस हवालदार अविनाश नलवडे, पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, सागर धेंडे ,विजय शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा येथील अे. अे.पवार, अन्न व सुरक्षा अधिकारी, आर. आर. शहा, आय.एस. हवालदार यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here