नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पाकिस्तानचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही क्षेत्रातील व्यक्तिमत्व उमर शरीफ यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप चिंताजनक होती. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या उपचारासाठी पंतप्रधान कार्यालयाकडेही मदत मागितली होती
उमर शरीफ ६६ वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते आणि बऱ्याच आजाराशी लढत होते. पाकिस्तानच्या कला परिषदेचे अध्यक्ष अहमद शाह यांनी शरीफ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कॉमेडियन कपिल शर्मानंही उमर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Alvida legend 🙏may your soul Rest In Peace 🙏🙏🙏 #UmerShareef pic.twitter.com/ks4vS4rdL0
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) October 2, 2021
२८ सप्टेंबर रोजी उमर शरीफ यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीन खालावत चालली होती. शरीफ यांच्या प्रकृती अस्वस्थतेबद्दल देशभरातील लोक नाराज होते जेव्हा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना व्हिडिओद्वारे परदेशात जाण्यासाठी व्हिसा देण्याचे आवाहन केलं होतं.
With deep sorrow it is announced that Mr. Umer Sharif has passed away. In #Germany. Our deepest condolences to hie family and friends. Our CG is present at the hospital to assist the family in every way.
— Dr Mohammad Faisal (@DrMFaisal) October 2, 2021
उमर शरीफ यांच्या पत्नीनं मागितली होती मदत सध्या उमर शरीफ हे व्हीलचेअरचं होते. त्यांना अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित उपचारांची आवश्यकता आहे, असं त्यांची पत्नी जरीन यांनी म्हटलं होतं. जर ते अमेरिकेत जाऊ शकले नाही तर त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन इथं करावं लागेल, जे त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. मात्र अमेरिकेत जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.






