पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शिरगाव येथे पवना नदीच्या कडेला दारूबंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.०१) हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचचे शामसुंदर गुट्टे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या कडेला जमिनीवर एक खड्डा करण्यात आला होता. त्यामध्ये १ लाख ६० हजार किमतीचे दोन हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायण आढळुन आले आहे. पोलिसांनी रसायन जप्त करून महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.






