अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : कुसुंबळे ग्रामपंचायतमध्ये शनिवार दि.०२आँक्टोबर२०२१ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामसभा राजा केणी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली
या ग्रामसभेस कुसुंबळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश म्हात्रे, सरपंच सौ.मिना लोभी,उपसरपंच सौ.रसिका केणी, ग्रामपंचायत सदस्य उत्तमशेट पाटील, प्रमोद पाटील, जीवन पाटील,श्री.अतिश नाईक,सौ.अर्चना पाटील,सौ.जागृती पाटील,प्रतिभा वाघ तसेच ग्रामपंचायतचे इतर कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,शिक्षक ,आरोग्य कर्मचारी,तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेची सुरूवात महात्मा गांधीनच्या फोटोचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले ह्या ग्रामसभेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरीकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.तसेच चिखली आरोग्य केंद्राला नविन रूग्णवाहीका उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री आदितीताई तटकरे,आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे आभार प्रदर्शनाचा ठराव घेण्यात आला तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांना जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांचें वाटप करण्यात आले.






