नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित; काँग्रेसच्या गीता पाडवी विजयी

नंदुरबार (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित करण्यास सुरूवात झाली असून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या भगिनी डॉ. सुप्रिया गावित या कोळदे गटातून १३६९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

१२ हजार ५६३ मतांपैकी ६ हजार ७०७ मते त्यांना मिळाली. येथे शिवसेनेच्या आशा पवार ५ हजार ३३९ मते मिळून पराभूत झाल्या. अक्कलकुवा आणि खापर गटात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.

यामध्ये खापर गटातून आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री वकील के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी गटातून सुरय्या मकरानी या विजयी झाल्या आहेत. होळ तर्फे हवेली गणात भाजपच्या सिमा मराठे २६८८ मते घेऊन विजयी झाल्या. तर शिवसेनेच्या स्वाती मराठे यांना २५७६ मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here