बेळगाव (प्रतिनिधी) : येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमधील बादल अंकलगी गावात ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंकलगी गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.
Karnataka | Seven people including two kids died in a house collapse incident due to heavy rain in Badala Ankalagi village, Belagavi at about 9 pm yesterday. CM Basavaraj Bommai has announced Rs 5 lakh compensation for the deceased's families. pic.twitter.com/HPUcII5GLq
— ANI (@ANI) October 6, 2021
बुधवारी रात्री साधारणत: ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत्यू झालेले सर्वच्या सर्व सातही जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






