दरोडेखोरांच्या टोळीस कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा बस स्टन्ड परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.कोतवाली पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडून संबंधित आरोपींकडून साहित्य साधनासह, एक लोखंडी तलवार, तीन लाकडी दांडके व एक लोखंडी कटावणी गावठी बनावटीचे पिस्तुल आधी मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपींना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी याचे आदेश न्यायालयाने दिले.

आरोपींमध्ये प्रविण संजय गंगावणे (वय २५ वर्ष रा. गुरवपिंप्री ता. कर्जत जि. नगर), मुकेश शंकर सावंत (वय ३४ वर्ष रा. सांगवी आष्टी ता.आष्टी जि.बीड), सुनिल ललीत थापा (वय ५७ वर्ष मुळ रा. भांडुप मुंबई हल्ली रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा जि. नगर), सुनिल कैलास खरमाटे (वय ३५ वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी जि. नगर), शंकर हिरामण शिरसाठ (वय २२ वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता.पाथर्डी जि. नगर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी तत्काळ सदरची गाडीही जप्त करून त्यांना तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये आरोपीना आणले व त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे सागर भानुदास पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पो.उप. निरीशक मनोज कचरे, भिंगारदिवे, नितीन शिदे, दिपक रोहकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, शरद गायकवाड, भारत इंगळे यांच्या पथकाने केली आहे. आरोपी मुकेश सावंत याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत.तर इतर आरोपींनी वर सुद्धा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here