पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : किरकोळ वादातून संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्याील दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11 सुमारास वाखारी गावच्या हद्दीत पिरबाबा दर्ग्याजवळ ही घटना घडली. रमेश सुंदर वाघमारे (वय-30 रा. कोरली. ता. मुरुड, जि. रायगड सध्या रा. वाखारी), पत्नी माया आणि चार मलुसांबोत या परिसरात राहत आहेत. पैशांच्या देवाणदेवाणीवरुन त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या रमेशने पत्नीला बेदम मारहाण केली.
रमेशने केलेल्या मारहाणीत मायाचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याने तिचा मृतदेह घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पुरला. यादरम्यान कोळसा व्यापारी नितीन ठोंबरे हे कामासाठी वाखारी गावात आले होते. त्यावेळी त्यांनी रमेशकडे पत्नी बाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने मी तीला मारुन टाकल्याचे सांगितले. याची माहिती ठोंबरे यांनी यवत पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी आरोपी रमेश वाघमारे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करीत आहेत.






