कन्नोज (उत्तर प्रदेश) : लग्नात हुंडा कमी दिला म्हणून दारुड्या पतीने पत्नीला शिक्षा म्हणून एका पार्टीमध्ये आपल्याच मित्रांच्या हवाली केलं. जेव्हा पतीच्या मित्रांनी महिलेसोबत जबरदस्ती आणि अश्लील व्यवहार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महिलेने आपल्या भावाला फोन केला. हे ऐकता महिलेची माहेरील मंडळी तातडीने तेथे हजर झाले. मात्र पती व त्याच्या मित्रांनी महिलेच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात केली.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती नेहमी दारू पिऊन तिला मारहाण करतो. लग्नात हुंडा न मिळाल्याने पती तिला नेहमी त्रास देतो आणि मारहाण करतो, असा महिलेने आरोप केला आहे. त्यादिवशी महिलेच्या पतीने दारूच्या नशेत तिला मित्रांच्या हवाली केलं.
यावेळी त्याच्या मित्रांनी अश्लील कृत्य केल्याचंही महिलेने यावेळी पोलिसांना सांगितलं. ज्यानंतर तिने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतलं. हुंडा कमी मिळाल्याने पती रागावला होता… पोलिसांकडे तक्रार करीत महिलेने सांगितलं की, तिचं कुटुंब वाचविण्यासाठी तिथं पोहोचले तर त्यांनाही मारहाण करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर पतीच्या मित्रांच्या तावडीतून महिलेची सुटका झाली. यानंतर शनिवारी सायंकाळी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली आणि हा सर्व प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस तिचा पती आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत आहेत.






