पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : अनुष्का फाऊंडेशन, चौफेर प्रतिष्ठान, चिमण्या गणपती मंडळ, समर्थ महिला प्रतिष्ठान आयोजित भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत रविवार (दि.३) रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर तरतुदी व निरोगी मनःस्वास्थ्य या विषयात मागर्दशन पर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अॅड. प्रमोद बेंद्रे (ज्येष्ठ विधिज्ञ, सहसंचालक, मोतिबाग नगर) व अॅड. सौ. अनिशा फणसळकर (ज्येष्ठ समुपदेशिका) यांनी उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार श्री.गिरीश जी बापट व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. मुक्ता शैलेश टिळक, सी.ए.श्री.विवेक मठकरी ( अध्यक्ष, संपदा सहकारी बँक) तसेच श्री.हेमंत रासने (स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.







