कर्जत तालुक्यातील सावेळे येथील खुनाचा फिर्यादी ठरला आरोपी

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सावेळे गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणाऱ्या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला होता. या घटनेत तबेल्याच्या मालकालाही मारण्यात आले होते. मात्र कर्जत पोलिसांनी 3 दिवसांत या खुनाचा छडा लावला असून खुद्द फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

कर्जत तालुक्यातील सावेळे गावातील आरिफ हाजीमिया मुल्ला यांचा म्हशीचा तबेला आहे. त्यांच्याकडे गणपत रावजी जाधव हे अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होते. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्या तबेल्यावर चार अज्ञात इसम आले आणि त्यांनी तेथे कॉटवर झोपलेल्या आरिफ हाजीमिया मुल्ला यांच्या अंगावर चादर टाकून तोंड आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. डासांचा त्रास होऊ नये म्हणून अंगावर चादर घेऊन झोपलेले आरिफ मुल्ला यांची देहयष्टी मजबूत असल्याने त्यांनी तोंड दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार अज्ञात व्यक्तींना आपल्या ताकदीने दूर लोटून दिले.

मात्र त्यावेळी आरडाओरडा करीत असलेले ७५ वर्षीय कामगार गणपत रामजी जाधव यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी मारहाण केली. तर अज्ञात इसमांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्यांच्या डोक्यात त्या अज्ञात इसमांनी लोखंडी हत्यारांनी वार केल्याने आरिफ मुल्ला आणि गणपत जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले. त्या तबेल्यावर आरिफ यांचा मुलगा सादिक याला आरिफ हे फोन करून दूध पाजण्यासाठी बोलावत असतात.

वडिलांचा फोन आला नाही म्हणून सादिक आरिफ मुल्ला हा तबेल्यावर पोहचला असता त्याला त्याचे वडील आरिफ हाजीमिया मुल्ला हे बेशुद्ध तर आणि कामगार गणपत रामजी जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले.याबाबत सादिक मुल्ला यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

तबल्याचे जखमी असलेले मालक आरिफ हाजीमिया मुल्ला यांच्या सांगण्यावरून कर्जत पोलीस ठाण्यात दि.६ ऑक्टोबर रोजी कॉ. गु. न.जि. नं २६५/२०२१, भा.दं. वि. सं का. कलम ३०२, ३०७, ३४ फिर्यादी दाखल करण्यात आली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलोस अधीक्षक अशोक दुधे यांनी पहाटेच माहिती घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधिक्षक संजय शुक्ला यांना तातडीने घटनास्थळी पाठविले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की व पोलीस कर्मचारी यांनी घटनेचा तपास सुरू केला होता.

फिर्यादीच्या सांगण्यावरून पोलिसांनी संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती, मात्र फिर्यादी आरिफ मुल्ला यांच्याकडे पुन्हा चौकशी सुरू केली त्याच्या डोक्यात झालेली जखमेचे स्वरूप पाहता व तो सांगतो त्या माहिती नुसार तफावत आढळुनयेत होती पोलिसांनी आरिफ मुल्ला यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गणपत जाधव हा काम ऐकत नसल्याने मला त्याचा राग आला मी त्याच्या डोक्यात लोखंडी फावडे घालून त्याचा खून केला असल्याचे कबूल केले. आरिफ मुल्ला (वय-६५) याला पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी अटक केली असून त्याला आज दि.९ ऑक्टोबर रोजी कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here