कल्याण (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : ठाणे वैभव व समर्थ ॲडव्हर्टायझिंग गुरुवंदना विशेषांक प्रकाशन सोहळा, आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ शनिवारी ९ ऑक्टोबर२०२१ रोजी छत्रपती शिक्षण मंडळाचे अभिनव विद्यालय पारनाका कल्याण येथे संपन्न झाला.
ठाणे वैभव गुरुवंदना विशेषांकाचे संपादकीय संपादक मिलिंद बल्लाळ यांनी शिक्षकांबद्दल आदर भावना त्यांच्या कार्याची प्रशंसा आणि आता सध्या ऑनलाईन जे शिक्षण घेतले जाते त्याबद्दलचे वर्णन सुरेखपणे केलेले आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला आहे.निखिल मिलिंद बल्लाळ यांनी विशेषांकाचे संयोजन केले. व्यासपीठावर आमदार संजय केळकर, ठाणे वैभव कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ,मच्छिंद्र युवराज कांबळे विशेषांक समन्वयक समर्थ एडवर्टाइजमेंट संचालक,डॉ. योगेश जोशी व मिलिंद जाधव यांनी गुरुवंदना विशेषांक पुरवणीचे लेखन केलेले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकुमार किशोर पानसरे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस स्वाभीमान शिक्षक संघ,विजयकुमार देसले, डॉक्टर वैदेही दप्तरदार,हेमंत नेहते आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित असलेले कार्यक्रमाचे छायाचित्रे, व्हिडिओ शूटिंग छायाचित्रकार सुभाष जैन यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे ,कार्यक्रमाचे स्वागत गीत व ईशस्तवन रुपेश बोराडे यांनी केले.







