जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ॲड अनिशा फणसळकर यांचे मनाचा संवादावर व्याख्यान

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : रविवार (दि. १०) रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पुणे येथे सिंहगड रोड येथील कॉन्सीलिंग सेंटरवर ॲड अनिशा फणसळकर ह्यांनी मनाचा संवाद आयोजित केला होता . मन:स्वास्थ्यासाठी काय काय उपाय करता येतील ,तसेच मनाचे आरोग्य राखण्यासाठी छोटया छोटया टिप्स त्यांनी समजावल्या .

आपल्या आयुष्यात ” पसारा हवा कि पिसारा ” पसारा म्हणजे सर्व ऐहिक सुखे व पिसारा म्हणजे स्वानंद ,स्वःजाणीव, मनाने जवळ असणारी माणसे , स्वार्थीन होता स्व ला कसे कुरवाळायचे व स्वतःचा आनंद कसा शोधायचा ह्यावर संवाद व उहापोह करण्यात आला . सर्वांनी खुप छान प्रतिसाद दिला . शारीरिक खादयाबरोबरच मानसिक व बौद्धिक खादय कसे गरजेचे हे त्यांनी सोदाहरण समजावले .

पुढील वर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम घडेल मात्र स्वतःत सकारात्मक बदल कसे घडतील ह्यावर काम करू व पुढील वर्षी नव्याने भेटु ह्या आश्वासनावर कार्यक्रम पार पडला .प्रणोती हिने खुप छान समर्पक बुकमार्क तयार करून सर्वांना गिफ्ट केला . गप्पा -गंमत- खानपान नंतर कार्यक्रमाची सांगता झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here