जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले.
या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, काँग्रेसचे नेते चंदन पाटील यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे गट नेते पप्पू भावे,चंदन पाटील,रतिलाल नाना चौधरी,विलास महाजन,भागवत आप्पा चौधरी,अरविंद्र देवरे,मोहन पाटील,धीरेंद्र पुर्भे,अजय चव्हाण,बुटया पाटील,रवींद्र जाधव,बाळासाहेब जाधव,योगेश पी.पाटील,सतीष बोरसे,नगराज पाटील,विनोद रोकडे,अरवींद्र चौधरी,महेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.






