१० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून मदरशाचा मौलवी फरार

संत कबीर नगर (उत्तरप्रदेश) : येथील मेंहदावल तालुक्यातील एका गावात असलेल्या मदरशात मुश्ताक नावाचा मौलवी मुलांना शिकवण्याचं काम करतो. काही दिवसांपूर्वी सुट्टीच्या दिवशी त्याने काही मुलांना शिकण्यासाठी मदरशात बोलावलं होतं.



शिकवणी संपल्यानंतर एकाच कुटुंबातील तीन मुलांना थांबवून ठेवलं. त्यातल्या १० वर्षांच्या मुलीला त्याने जवळ बोलवलं आणि तिच्या दोन्ही भावांना मदरशापासून काही अंतरावर असलेल्या चौकात पेन आणण्यासाठी पाठवलं. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला याबाबत कुणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.



मुलीने घरी जाऊन आईला याबाबत सांगितलं. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केली. पोलीस जेव्हा त्याला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा तो आधीच तिथून फरार झाला होता. या मौलवीची वागणूक योग्य नसल्याची साक्ष मदरशाच्या परिसरातील रहिवाशांनी दिली आहे. या मौलवीचा शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here