यवतमाळ (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : शहरातील आर्णी रोड मार्गावर जुन्या वादातून दोघांची धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना १०.४५ वाजता घडली.
दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वसीम पठान व त्याचा सहकारी उमेश येरमे दोघेही रा. नेताजी नगर यांच्यावर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. दोघांनाही जागेवरच गतप्राण होईपर्यंत मारहाण करण्यात आली.
नवरात्र उत्सवाच्या काळात शहरात भाविकांची गजबज असताना हे हत्याकांड घडले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आहेत मृतांची आणखी ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.






