३ फॅक्टरी मेड अॅटो लॉक पिस्टल व ०१ रिव्हाल्वर सह १० जिवंत राऊंड विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कक्ष-१० गुन्हे शाखेने केले जेरबंद

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : दिनांक ०९/१०/२०२१ रोजी कक्षाचे प्रपोनि श्री महेशकमार ठाकर यांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, सुरेन रोड, गरुनानक पेटोल पंपा जवळ, गोंविदवाडी. अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणा एक इसम बेकायदेशिर अग्निशस्त्राची विक्री करण्यासाठी येणार आहे. प्रपोनि श्री महेशकुमार ठाकुर याना सदरचा माना वरिष्ठांना अवगत करुन, कक्षाच्या अधिकारी व अंमलदाराचा सुसंगत व नियोजनबद्ध सापळा रचला.

दिनांक ०९/१०/२०२१ रोजी २३:२० च्या सुमारास रचलेल्या सापळयात अंधेरी मेट्रो स्टेशन कडुन घाटकोपरच्या दिशेने रहदारी मध्ये एक संशयीत पायी चालत येवन सरेन रोडच्या सुरवातीला, गुरुनानक पेट्रोल पपा जवळ, गोविदवाडी, अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणी थांबन कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसुन आले. सदर इसम हाच अग्नीशस्त्र विक्रीस करण्यास आल्याबाबत गुप्त बातमीदाराने इशारा करताच पोलीस पथकाने त्यास घेराव घालुन जागीच ताब्यात घेतले. सदर इसमाची पंचा समक्ष घेतलेल्या झडती मध्ये त्याच्या कब्जातील बॅग मध्ये ०३ फैक्टरी मेड अॅटो लॉक बनावटीची पिस्टल, ०१ रिव्हाल्वर व १० जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर आरोपीता विरोधात एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करुन पुढील तपास गु.प्र.शा., वि.स्था.गु.र.क्र. ३२/२०२१ (एमआयडीसी पोलीस ठाणे, वि.स्था.गु.र.क्र.१०९/२०२१), कलम ३,२५ भाहका सह ३७(१)(अ),१३९ म.पा. का. अन्वये कक्षात घेण्यात आला आहे. हस्तगत मालमत्ता – १) ०३ फॅक्टरी मेड ॲटो लॉक बनावटीची पिस्टल अं.कि. १,५०,000/२)०१ रिव्हाल्वर, अं.किं.४०,000/३) ०१ मोबाईल अं.किं. १०,000/ एकुण किंमत- २,00,000/- रूपये.

आरोपी (वय ३८ वर्षे, धंदा चालक, रा.ठी. धंदा चालक, रा.ठी. रुम नं १०४, आर्शिवाद बिल्डिंग, मालेवाडी, नविन पनवेल, नवी मुंबई) आरोपी विरूध्द नवी मुंबई परिसरात खंडणी, विनयभंग, पोक्सो, चोरी, मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे हया सारखे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे कक्ष-१०, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ०७ पेक्षा जास्त गुन्हयात अटक असलेल्या सराईत गुन्हेगारास घातक ०४ अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस. विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) गुन्हे शाखा, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम.अति.कार्य.) गुन्हे शाखा श्री. अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली, कक्ष-१० गुप्रशा, मरोळ मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकुर, पोलीस निरिक्षक किरण लोंढे, पोलीस निरिक्षक उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वाल्मिक कोरे, पोलीस अंमलदार अहमद शेख, जगदीश धारगळकर, रामकिशन मोरे, चंद्रशेखर डफळे, स्वाप्निल खेडेकर, प्रकाश चव्हाण यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here