बनावट नोटा चलनात आणणाऱ्या महिला डॉक्टरसह पाच जणांची टोळी जेरबंद

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश लासलगाव पोलीसांनी केला असून या प्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींकडून बनावट ५०० रुपयांच्या १ लाख पंचेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे लासलगाव येथील राहणारे मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा बोराडे हॉस्पीटल जवळ लासलगावव विठ्ठल चपलाल नाबरीया रा कृषीनगर कोटमगाव रोड लासलगाव ता निफाड यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रविंद्र हिरामण राऊत रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक व विनोद मोहनभाई पटेल रा पंचवटी नाशिक हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० रुपयांच्या चलनी नोटा देणार आहे. अशी माहिती दिल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक माथुरी कांगणे , पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करन्यात आले.

या पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील , प्रतिभा घायाळ , विठठल नावरीया यांना बनावट ५०० रुपयांच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत रा स्मारक नगर पेठ ता पेठ जि नाशिक व विनोद मोहनभाई पटेल रा चाणक्य बिल्डींग ओमकार बंगल्याजवळ , सुर्यवंशीरोड पंचवटी – नाशिक हे त्यांचेडील इटीऑस कार क्रमांक एमएच ०३ सीएच ३७६२ मध्ये आले. पंचासमक्ष छापा टाकुन त्यांचेकडुन ५०० रुपयांच्या बनावट २९१ नोटा व इटीऑस कार किमंत अंदाजे ४ लाख जप्त करण्यात आली आहे.

या आरोपींनी भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट २९१ नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी प्रयत्न केला म्हणून पोलीस कोंस्टेबल प्रदिप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादवि कलम ४८९ क . ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here