उत्तर प्रदेशात तरुणीचे अपहरण करून बलात्कार

फतेहपूरी (उत्तरप्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाला आहे. तरुणीने आरोपीला विरोध केल्याने आरोपीने तिला जबर मारहाण केली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडित तरुणीला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयाच्या जवळ सोडले आणि तिथून पळ काढला.

जिल्ह्यात ही तरुणी छोटेसे दुकान चालवत होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पंडित महाराज नावाचा व्यक्ती आला आणि त्याने तरुणीशी बोलण्यास सुरूवात केली. पंडित महाराजने तरुणीला फसवून आपल्या घरी नेले. त्याची बायको पुजेसाठी बाहेर गेली होती. तेव्हा पंडित महाराजने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. तरुणीने पंडित महाराजला विरोध केला, परंतु त्याने तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी जबर जखमी झाली.

बलात्कार झाल्यानंतर आरोपी पंडित महाराजने तिला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयाबाहेर सोडले आणि तिथून पळ काढला. याबाबत पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. तसेच पोलीस आरोपी पंडित महाराजचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here