पोलीस मुख्यालयात २० हजारांची लाच घेतांना फौजदाराला अटक

bribe

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात २० हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यास रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीने महीला सहाय्य कक्ष,पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारदार व त्यांचे कुटूंबियांविरुद्ध तक्रारी अर्ज केलेला आहे. या अर्जाच्या चौकशीअंती त्यांच्या पत्नीला कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर तक्रारदार यांना योग्य ती मदत करण्याचे कारण सांगुन महिला दक्षता कार्यालयातील सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यांनी तक्रारदाराकडे २५ हजारांची मागणी केली.

तडजोडी अंती ही रक्कम २० हजार रुपये ठरली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, महेश सोमवंशी, नासिर देशमुख यांच्या पथकाने बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. व सहाय्यक फौजदार मिलिंद केदार यांना तक्रारदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here