पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : घरामध्ये मित्रांसोबत पार्टी सुरू असताना आयटी इंजिनिअरने मद्यधुंद अवस्थेतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पार्टीत सोबत असलेले मित्र घटनास्थळावरून पसार झाल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलिस साशंक असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
गणेश यशवंत तारळेकर (वय ४७) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे कोंढवा बुद्रुक येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांचा विवाह झालेला असून, त्यांना १४ वर्षांचा मूलगा आहे. ते आयटी इंजिनिअर होते. …






