देवी विसर्जनाला गालबोट, अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

अलिबाग – सोगावकर : रायगड जिल्ह्यात काल देवी विसर्जनाला गालबोट लागले आहे. येथील अंबा नदीत देवी विसर्जनाला गेलेले दोघे बुडाले. त्यांचा शोध घेतला असताना काहीही उपयोग झाला नाही. या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

रायगडमधील पालीजवळ राबगाव इथे अंबा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी देवी विसर्जनादरम्यान ही घटना घडली. शिवेंद्र चौहान आणि विवेक लहाने अशी मृतांची नावे आहेत.

संध्याकाळी विसर्जनावेळी दगडावरून पाय घसरून दोघे नदीत पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी दोघांचेही मृतदेह पालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here