भीलवाडा (राजस्थान) : येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. हॉटेल रुम स्वच्छतेच्या नावाखाली महिलेला खोलीत बोलावून तेथे आधीच उपस्थित असलेल्या इतर लोकांसह, तिला दारू पिण्यास लावली आणि नंतर ६ लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही या बलात्कारांमध्ये समावेश आहे.
भीलवाडा पोलीस उपअधीक्षक रामचंद्र यांनी सांगितले की, २८ वर्षीय महिला बाबा धामजवळ मजुरीचे काम करते. तिने आरोप केला की, काल संध्याकाळी एक व्यक्ती तिच्याकडे आली आणि तिला हॉटेल अमित पॅलेसमधील खोली स्वच्छ करण्यासाठी मजुरीवर घेऊन गेली. जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा आधीच तिथे मद्यपान करणाऱ्या लोकांनी तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. या नराधमांमध्ये ५ ते ६ मुलं आहेत. त्यांच्यामध्ये हॉटेलचा एक कर्मचारी आहे. ती त्याचे नाव सांगत आहे. बाकीची नावे तिला माहित नसल्याचे तिने सांगितले.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, पिवळा शर्ट घातलेला एक माणूस तिला स्वच्छतेसाठी हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. या कामाच्या बदल्यात त्याने तिला एक हजार रुपये देण्याबाबतही चर्चा केली. जेव्हा ती महिला त्याच्यासोबत खोलीत पोहचली तेव्हा तेथे तीन पुरुष आधीच दारू पिऊन बसले होते. महिला सुद्धा तिथे जाऊन बसली. मग या चौघांनी दारू प्यायला सुरुवात केली आणि महिलेलाही दारू प्यायला लावली. त्यानंतर त्यांनी महिलेवर बलात्कार करण्यास सुरुवात केली.
चौघांनी बलात्कार केल्यानंतर त्यांनी हॉटेलवाल्याला बोलावले आणि सांगितले की, तो हॉटेलचा मालक आहे आणि त्या माणसाने महिलेवर बलात्कार केला. दुसऱ्या एका माणसाने तिला ओढून नेले आणि तिला समोरासमोरील खोल्यांमध्ये नेऊन अत्याचार करत राहिले त्यानंतर तिला खोलीबाहेरून कुलूप लावून बंद केले. तेथून सुटका करून घेतल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
डीएसपीच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वक्तव्याच्या आधारे सुभाष नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. खात्री पटल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी केवळ महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले जात आहे. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.






