चवदार सांभार न बनवल्याचा राग आल्याने तरुणाने केला आई आणि बहिणीचा खून

उत्तरा कन्नड(कर्नाटक) : जिल्ह्यात चवदार सांबार बनवले नाही म्हणून एका तरुणाने आपल्या आई आणि बहिणीला निर्घृणपणे ठार मारले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

पार्वती नारायण हसलर आणि रम्या नारायण हसलर अशी मयत मायलेकींची नावे असून मंजुनाथ नारायण हसलर असे आरोपी तरुणाचे नाव असून कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे.

आरोपी मंजुनाथ हा मद्यपी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. तो अनेकदा घरात भांडणं करीत असे. बुधवारी, जेव्हा मंजुनाथ घरी पोहचला आणि जेवायला बसला, तेव्हा सांभार चवदार झाले नाही म्हणून त्याचे बहीण आणि आईशी भांडण झाले. या व्यतिरिक्त त्याच्या आईला कर्ज घेऊन त्याच्या बहिणीसाठी फोन खरेदी करायचा होता, यालाही त्याचा विरोध होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here