पुण्यात तरुणाचा गळा चिरून खून; मोठा भाऊ ताब्यात, पुणे पोलिसांकडून तपास सुरू

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : सोलापूर रोडवर हडपसर हद्दीत पंधरा नंबर चौक येथे एका युवकाचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात हा खून झाला असून सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. (

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. खुनाचं कारण समजू शकलेलं नाही. प्रदीप शिवाजी गवळी (वय २३ रा. पंधरा नंबर, हडपसर) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

गवळी हा रिक्षाचालक होता. तो त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. या प्रकरणी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here