दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीने पॅरोलवर बाहेर येताच केली तिसरी हत्या

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : दोन हत्या प्रकरणात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीने पॅरोलवर बाहेर येताच धारदार शस्त्राने वार करुन तिसरी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापुरातील ६५ वर्षीय आरोपी पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे ही घटना घडली असून, आमसिद्ध पुजारी असे ६५ वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने ज्ञानदेव प्रभू नागणसूरे नावाच्या ५५ वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राने डोकं, मान, गुडघ्यावर वार करुन खून केला.

याआधी आमसिद्ध पुजारीने त्याच्या पत्नीचा खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरून सात वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून त्याने बायकोची हत्या केल्याचा आरोप होता. तर पंधरा वर्षापूर्वी अंत्रोळी येथील लक्ष्मण सलगरे नामक इसमाचा पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने खून केला होता. खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर गावात आला होता. आरोपी आमसिद्ध पुजारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here