महाराष्ट्र (उपसंपादक सुनिल तंबूसकर) : गुरुवार दिनांक १४ आक्टोबर२०२१रोजी दुपारी दोन वाजता आयकर भवन स्थित आयटी सेवा मुंबई युनिट यांच्या विद्यमाने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
प्रथम भगवान बुध्द आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुज्य प्रतिमांना हार घालून मुर्तीना फुले व दिपप्रज्वलन करून त्रिसरणपंचशील भिमस्तुती सामुदायिक वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाचेअध्यक्ष अरविंद रामटेक, सेक्रेटरी श्री.जंनबंधु यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांचे सहकारी जयभीम ननावरे, सुरेन्द्र जाधव, राजेश पंडित, रूपेश बेसेकर, विजय सेंद्रे, संजय कांबळे, वसंत माने, ह-दयनाथ हिवराळे, श्री.लांजेवार, श्री. सोनावले, दत्ता चोरगे , सज्जन करपे, प्रविण गौरशेडे, शहाजी ढोबळे, मित्रजीत कांबळे, संजय शिंदे तसेच आयटी एफ युनियनचे अध्यक्ष गोंधळेकर, लोकाधिकार समितीचे प्रमोद वाघे , श्री.यादव तसेच भावना सोनवणे पौर्णिमा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.







