साईसंस्थानचे प्रसादालय सुरू करावे – शहराध्यक्ष तुषार महाजन

साईबाबांचे प्रसादालय अटीशर्तीचे पालन करून सुरु करण्याची निवेदनाद्वारे मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेघा किचन असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाचे नियम आणि अटीशर्तीचे पालन करून सुरू करावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत मॅडम यांना भारतीय जनता युवा वॉरियर्स यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश अण्णा गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

युवा वॉरियर्स शहराध्यक्ष तुषार महाजन म्हणाले की, श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाच्या नियम आणि अटीशर्तीचे पालन करत सुरु करावे. साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली दर्शन व्यवस्था अतिशय उत्कृष्ट असून श्री साईबाबांचे दर्शन मनोभावे घेता आल्याचा आनंद यावेळी भाविकांनी व्यक्त करून दाखवला, परंतु साईबाबांचा प्रसाद न घेता शिर्डीतून माघारी जाण्याची वेळ आली असल्याची खंत भाविकांनी बोलून दाखवली असून संस्थानने भाविकांच्या भावनेचा विचार करून लाडूप्रसाद व प्रसादालय सुरू करावे.

दोन वर्षापासून भाविकांसाठी प्रसादालय बंदच आहे. किमान प्रसादालय सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझर मास्क याचा वापर करून सुरू केल्यास गोरगरिबांना तसेच साईभक्तांना लाभ मिळेल. लवकरात लवकर प्रसादालय साईभक्तांसाठी अटीशर्तीचे पालन करून सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी युवा वॉरियर्स अध्यक्ष तुषार महाजन, सागर बेलदार, ऋषिकेश उपाध्ये, प्रथमेश सजन, साहिल बेलदार, आसिफ पिंजारी, मयूर आडागळे, भावीन जोशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here