कुऱ्हा पानाचे येथील महाराष्ट्र विद्युत कार्यालयाला ठोकले कुलूप

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील रोहित्र नं ७२६ नादुरुस्त असल्यामुळे शेती शिवारातील वीज पुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यास विलंब झाला. तसेच पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतातील विहिरी पूर्ण भरलेल्या आहेत. विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. मात्र विजपुरवठ्याअभावी सर्व कामे खोळंबली होती. यामुळे कुऱ्हा पानाचे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी महाराष्ट्र विद्युत कार्यालयाला कुलूप ठोकले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील रोहित्र नं ७२६ नादुरुस्त असल्यामुळे शेती शिवारातील वीज पुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. वारंवार सूचना देवूनही संबंधित कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत.अनेक वेळा विनंती अर्ज करूनही डीपी दुरुस्त करीत नाहीत.काही शेतकऱ्यांनी आपले काही बिल भरलेले आहेत.काही शेतकऱ्यांचे बिल भरणे बाकी आहे. मात्र विजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांची बिकट अवस्था निर्माण झालेली आहे.

वारंवार सांगूनही ही डीपी दुरुस्त होत नसल्याने, कुऱ्हा पानाचे येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ पाटील,अमोल पाटील, सुनील पाटील ,शेखर पाटील तसेच ग्रामस्थ यांनी कार्यालयात आज दुपारी साडेचार वाजता कुलूप लावले. त्यांच्या मनातील भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर डीपी दुरुस्ती व्हावी गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here