ग्रामसंवाद सरपंच असोशिएशनतर्फे महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा पदाधिकारी संवाद बैठक संपन्न

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : येथे बुधवार (दि.20) ग्रामसंवाद सरपंच असोशिएशनतर्फे महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा पदाधिकारी संवाद बैठक घेण्यात आली

यावेळी जिल्ह्यातील ११ गावे दत्तक योजना,गाव पातळीवर सरपंचांना येणार्‍या विविध अडचणी आणि त्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने झालेल्या या संवाद सभेत मंचावर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिनाथ धामणे, महाराष्ट्र राज्य सचिव विशाल लांडगे पाटील, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख अजितसिंह राजपूत, उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष मोहन पाटील, सचिव सुरेश धनगर जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिरसोलीचे सरपंच तथा जळगाव तालुकाध्यक्ष प्रदीप रावसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल आप्पा रोटे, जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील, जळगाव जिल्हा सचिव सागर पारधी, चाळीसगाव तालुका अध्यक्ष भीमराव चव्हाण, भडगाव तालुका अध्यक्ष, डॉ.निळकंठ पाटील , पाचोरा तालुका अध्यक्ष श्री राहुल रामराव पाटील ,जळगाव जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील वंजारी कोषाध्यक्ष जळगाव जिल्हा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here