गुंगीचं औषध देऊन युवतीवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मैत्रिणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अक्षय कदम नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अक्षय कदमने तरुणीला आपल्या फ्लॅटवर नेले. त्यानंतर तिला ज्यूसमधून गुंगीचं औषध दिलं होतं. गुंगी आल्यानंतर त्याने युवतीवर बलात्कार केला.

अक्षयने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील शूट केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अक्षय कदम पुण्यातील आंबेगाव परिसरातील रहिवासी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here