बारां (राजस्थान) : लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर १ लाख ८० हजार रूपयात आपल्या पत्नीला एका ५५ वर्षीय व्यक्तीला विकण्याच्या आरोपात १७ वर्षीय किशोरला अटक करण्यात आली आहे. आरोपी किशोर ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्यात राहणारा आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून २४ वर्षीय तरूणीच्या संपर्कात आला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर दोघांचे परिवार दोघांचं पारंपारिक पद्धतीने लग्न लावून देण्यास तयार झाले. लग्नाच्या ठीक दोन महिन्यांनंतर किशोरने काही आर्थिक समस्यांचा हवाला देत आपल्या पत्नी आपल्यासोबत रायपूर विटांच्या भट्टीवर काम करण्यासाठी आणि एकत्र कमावण्यासाठी सांगितलं. पण त्याऐवजी तो आपल्या पत्नीला राजस्थानमधील एका गावात घेऊन गेला. ५५ वर्षीय व्यक्तीला पत्नीला विकलं.
ऑगस्टमध्ये दाम्पत्य एका विटाच्या भट्टीवर काम करण्यासाठी रायपूर आणि झांसी मार्गे राजस्थानला गेले. नव्या नोकरीच्या काही दिवसांनंतर किशोरने आपल्या पत्नीला बारां जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय व्यक्तीला एक लाख ८० हजार रूपयांना विकलं. आपल्या पत्नीला विकल्यानंतर किशोरने खाण्यावर बराच पैसा खर्च केला आणि काही पैशांनी महागडा मोबाइल खरेदी केला. त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना ओडिशातील घरी परत बोलवलं आणि आरोप लावला की, पत्नी कुणासोबत तरी पळून गेली. मुलीच्या घरच्यांनी त्याच्या कहाणीवर विश्वास ठेवला नाही आणि पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले तर त्याच्या सांगण्यात काहीतरी गडबड दिसली. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशीसाठी एसपी नितीन कुसालकर यांनी एक टीम तयार केली. एसपीने सांगितलं की, आम्ही त्याची चौकशी केली आणि समजलं की, त्याने त्याच्या पत्नीला विकलं. तरूणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक टीम राजस्थानला पाठवली. ओडिसाहून पोलिसांची टीम बारां गावात पोहोचली तेव्हा तरूणीला वाचवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. कारण गावातील लोकांनी रस्त्यावर जाम केला होता आणि तरूणीला पोलिसांसोबत जाऊ देत नव्हते.
५५ वर्षीय व्यक्तीने सांगितलं की, आम्ही तिला १ लाख ८० हजार रूपयात खरेदी केलं आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीने ओडिशा पोलिसांची टीम तरूणीला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यास यशस्वी ठरली. तरूणीची विचारण्यात आलं की तिला कुठे जायचं आहे तर ती ओडिशात आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचं बोलली. त्यानंतर गावातील लोक तिला सोडण्यास तयार झाले. किशोरने दावा केला की, त्याने आपल्या पत्नीला विकलं नव्हतं तर त्याने तिला ६० हजार रूपयात गहाण ठेवलं होतं. तो म्हणाला की, त्याला पैशांची गरज होती. कारण त्याला हृदयाचा आजार आहे आणि त्याला सर्जरीची गरज आहे. १७ वर्षीय किशोरला न्यायालयात हजर करून त्याला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.






