सातारा जिल्ह्यातील जवान सचिन काटे य‍ांचा राजस्थानमध्ये मृत्यू

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यातील संभूखेड (ता. माण) गावचे सुपूत्र व सैन्यदलातील जवान सचिन काटे य‍ांचा राजस्थानमध्ये कार्यरत असतांना आकस्मिक मृत्यू झाला. सचिन यांचा मृत्यू झाल्य‍ाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली.

सचिन यांचे पार्थिव संभूखेड शनिवारी पहाटे पोहचले. संभूखेड (ता. माण) येथील सामान्य शेतकरी कुटुंबात विश्वनाथ व उषा काटे या दाम्पत्याच्या पोटी सचिनचा १५ जून १९९७ रोजी जन्म झाला. विश्वनाथ काटे यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा सचिन राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होते. तर लहान रेवन काटे हे आसाममध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहेत.

सचिन काटे यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झ‍ाले. त्यांनी ११ वी व १२ वी विज्ञान शाखेमधून महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दहिवडी कॉलेज दहिवडी येथे कला शाखेत प्रवेश घेऊन एन. सी.सी. जॉईन केली. याच वर्षी २०१६ मध्ये ते सैन्यदलात भरती झाले.

शालेय जीवनात असताना त्यांना कबड्डी खेळाची आवड होती. विज्ञान शाखेमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्याने टेक्नीकलमधून रणगाडा ट्रेड मॅकेनिकल म्हणून भरती झाले. सिकंदराबाद येथे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ते राजस्थानमध्ये देशसेवेसाठी कार्यरत होते. लहानपणापासून देशसेवेची ओढ असल्याने पहिल्या प्रयत्नात वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यदला मध्ये भरती झाले होते. जवान सचिन काटे यांचा मृत्यू झाल्य‍ाने संभूखेड गावामध्ये शोकाकूल वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here