अश्लील व्हिडीओ दाखवून २८ वर्षीय तरुणीवर अत्याचार; एकाला अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथे एका २८ वर्षीय तरुणीवर पॉर्न व्हिडिओ दाखवून अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका बॅंकेतील कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्याने सुरवातीला तीला फ्लॅटवर नेऊन ज्युसमध्ये गुंगी येणारे औषध टाकत अत्याचार केले. यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आले.

अक्षय कदम (रा.सिंहगड कॉलेज कॅम्पस, आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचार करण्याअगोदर तो तीला पॉर्न व्हिडिओ दाखवत होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here