मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या आईचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे समजते आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्यानं त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान शुक्रवारीच राज ठाकरे यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here