बारावीची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक झाले अवाक; वडिलांचं नाव सनी देओल, आई प्रियांका चोप्रा

answer-sheet-1

बेतिया (बिहार): परीक्षेदरम्यान काही मुलांनी उत्तर पत्रिकेत लिहिलेली उत्तरे पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. मात्र बिहारमधील राम लखन सिंह यादव कॉलेजमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेला जगावेगळा प्रकार शिक्षकांना अवाक करणारा ठरला आहे. सध्या अशाच उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एका विद्यार्थ्याने तर उत्तर पत्रिकेत आपल्या आईच्या नावाच्या जागी प्रियंका चोप्राचं नाव लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या विद्यार्थ्याने वडिलांचं नाव सनी देओल लिहिलं आहे. तर दुसऱ्या एका पठ्ठ्याने उत्तरपत्रिकेत प्रेमात ‘बेवफा’ झाल्याबद्दल लिहिलं आहे. राम लखन सिंह यादव महाविद्यालयाच्या उत्तर पत्रिकेवर अभिनेता, अभिनेत्रींची नावे पाहिल्यावर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, या उत्तरपत्रिकांवर रोल नंबर नाही आणि प्रश्नांच्या उत्तरात नानाविध विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत.

answersheet-2

एका अन्य व्हायरल कॉपीमध्ये विद्यार्थ्याचं नाव आदित्य कुमार, रोल नं-१७०, वर्ग- १२ लिहिण्याबरोबरच एका तरुणीचं नाव लिहिण्याबरोबरच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. व्हायरल होत असलेल्या उत्तर पत्रिकेत पुरातत्वबदद्ल प्रश्न विचारला होता, त्याखाली विद्यार्थ्यांनी लिहिलं की, आम्हाला शिक्षकांनी त्याबद्दल शिकवलं नाही. तर मोहनजोदडोच्या विशाल स्नानागारच्या वर्णनाबद्दल लिहिलं आहे की, राजाची पत्नी तेथे नाचत असे आणि कपडे चोरी करीत होत्या. दरम्यान अशा प्रकारच्या उत्तर पत्रिकापाहून कोरोना कालावधीनंतर सुरु झालेल्या महाविद्यालयातील मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here