चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर फेकले उकळते तेल

नागपूर (उपसंपादक उमेश अबलनकर) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्यावर उकळते तेल फेकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. भावनाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा सतीषला संशय होता. यावरून त्यांच्या नेहमीच वाद होत. गुरुवारी रात्री भावना झोपली. त्यानंतर सतीश शुक्रवारी भल्या पहाटे उठला. भावना झोपलेलीच होती. सतीशने घरातील कढईत तेल उकळविले. ती झोपेत असतानाच तिच्या अंगावर हे उकळ‌ते तेल ओतले.

या हल्ल्यात तिचे हात, पाय, छाती भाजली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून, पोलिसांनी या प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here