‘सहकारी निवडणूक मार्गदर्शक ‘ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : सहकारी संस्थांमधील निवडणूक प्रक्रियां बद्दल मार्गदर्शन करणाऱ्या ‘सहकारी निवडणूक मार्गदर्शक ‘ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी २५ ऑक्टोबर,दुपारी दोन वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात होणार आहे.

या पुस्तकाचे लेखन सहकार क्षेत्रातील लेखक बी एस .जाधव ( सातारा )यांनी केले आहे. भक्ती बुक्स (नागपूर )यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून जाधव यांचे हे पाचवे पुस्तक आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव भास्कर गिरी यांच्या हस्ते तसेच राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचे निवृत्त उपसंचालक कर्नल आर आर जाधव, ‘ प्रबोधन माध्यम ‘ चे संस्थापक डॉ.दीपक बीडकर, ‘ भक्ती बुक्स् ‘ चे संचालक लक्ष्मीकांत जयपूरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here